‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतराचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी
या कादंबरीत शेतकऱ्यांचे प्रश्न, शरद जोशींचा विचार, शेतकऱ्यांचं आजचं जगणं, शासनाकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक, निवडून येणाऱ्या प्रतिनिधींचं शेतकरीविरोधी वर्तन या साऱ्याचं वर्णन वास्तव दाखवणारं आहे. लेखक जणू काही या साऱ्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी आहे, असं वाटतं. याशिवाय राजकारणातील सूक्ष्म बाबीही इतक्या नजागतीनं टिपल्या आहेत की, आपण अवतीभोवती पाहताना हे चित्र दिसतं.......